मुंबई – महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन –
तसेच शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांचे श्रीगणेशमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, माजी खासदार रावसाहेब दानवे हे उपस्थित होते