नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. रशियातल्या मॉस्को शहरात होणाऱ्या ७५ व्या विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते रशियाला रवाना झाले आहेत.
Defence Minister Rajnath Singh leaves for a three-day visit to Russia during which he will hold talks with top Russian military brass and attend a military parade in Moscow to mark 75th anniversary of the Soviet victory over Germany in Second World War
— Press Trust of India (@PTI_News) June 22, 2020
आपल्या देशात लॉकडाउन जाहीर केल्यानंतरचा राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच दौरा आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमारेषेवर तणावाचे
वातावरण आहे. तणावाच्या या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह या संदर्भात रशियासोबत काही चर्चा करणार का? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे रशियाशी सुरक्षा विषयक धोरण या विषयावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ते चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षाचा उल्लेख करणार का? त्यावरुन काही उभय देशांमध्ये काही महत्त्वाची चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.