Union Budget 2024 । iPhone : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (दि. 24 जुलै) संपूर्ण देशाचे बजेट सादर केले. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला.
या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार? तर कोणत्या गोष्टी महागणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. सोने-चांदीसह मोबाईल, चार्जर, इलेक्ट्रिक वाहने, सोलार, मासे अन्न, चामड्याच्या वस्तू, रासायनिक पेट्रोकेमिकल, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर अशा अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत.
निर्मला सीतारामण यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता स्मार्टफोन स्वस्त होण्याची मोठी शक्यता आहे. तर मोबाईल कंपनी देखील आपल्या आगामी फोनची किंमत कमी करणार असल्याचं बोललं जात आहे.
बजेटमध्ये कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आली आहे, म्हणजेच ज्या फोनसाठी आधी 24,000 रुपये मोजावे लागत होते, ते आता 23,000 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्रश्न आहे कसा? समजा फोनची खरी किंमत 20,000 रुपये आहे. त्यावर 20 टक्के कर लावल्यास त्याची किंमत 24 हजार रुपये होईल. कारण 20 हजार रुपयांचे 20 टक्के म्हणजे चार हजार.
आता 5 टक्के कस्टम ड्युटी कपात केल्यानंतर त्या फोनची किंमत 24,000 रुपयांऐवजी 23,000 रुपये होईल. कारण 5 टक्के कस्टम ड्युटी म्हणजे 1000 रुपये.
भारतात आयफोनचे प्रो मॉडेल, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro max, गुगलचे अनेक स्मार्टफोन मॉडेल आयात करण्यात येतात. तर काही स्मार्टफोन देशात असेम्बल करण्यात येतात. तर जे स्मार्टफोन पूर्णपणे बाहेर देशात तयार होऊन भारतात आणण्यात येतील.
त्यांच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांची किंमत आता कमी होईल. आतापर्यंत हे बाहेरील स्मार्टफोन महागडे मिळत होते. त्यांच्या किंमती जवळपास 10 हजार रुपयांनी कमी होतील.
समजा iPhone 15 Pro Max चे टॉप मॉडेल 2 लाख रुपयांना मिळतो. या स्मार्टफोनवर भारतात 20 टक्के आयात शुल्क द्यावे लागत होते. त्यामुळे किंमत 40 हजार आयात शुल्क द्यावे लागत होते.
आता या शुल्कात 5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या मॉडेलवर 30 हजार रुपये आयात शुल्क द्यावे लागेल. स्मार्ट खरेदी केल्यास 10 हजार रुपयांचा थेट फायदा होईल.
लक्षात ठेवा, कस्टम ड्युटी फोनच्या किंमतीवर अवलंबून असते, जर तुम्ही 1 लाख रुपयांचा फोन खरेदी करत असाल तर 20 टक्के दराने 20 हजार रुपये आणि 15 टक्के दराने 15 हजार रुपये कस्टम ड्युटी लागेल.
‘या’ गोष्टी झाल्या महाग
टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत, त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे.प्लास्टिक महाग होणार आहे. टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्टॉक मार्केटमधून इन्कम होणाऱ्यांना वेगळा टॅक्स भरावा लागणार आहे. त्यावरील करदेखील वाढवण्यात आला आहे.