IMP NEWS Budget 2021 : कोणत्या वस्तू होणार ‘महाग’, कोणत्या ‘स्वस्त’ ? पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली – बजटमध्ये कोणत्या वस्तु महागणार व कोणत्या स्वस्त होणार यावर सर्वात जास्त लक्ष असते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना अनेक वस्तुंच्या किंमती वाढणार असल्याचे तर काही वस्तुंच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगितले आहे.

Budget_2021 | अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात ‘मोठी’ घट; वाचा आजचे दर… 

या अर्थसंकल्पात मोबाईल पार्ट्स मधील सुटमध्ये कपात केली आहे. याचा परिणाम मोबाईल फोन महाग झाला आहे. तसेच मोबाईल चार्जर देखील महाग झाले आहे. तर नायलाॅनचे कपडे स्वस्त झाले आहेत. रत्नांच्या किंमती वाढणार आहेत. पाॅलिस्टर कपड्यांच्या किंमती स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार व कोणत्या स्वस्त होणार संपूर्ण लिस्ट.

या वस्तु महागल्या –

 • मोबाईल फोन
 • मोबाईल चे चार्जर
 • मोबाईल पार्ट्स वरील सुट कपात
 • रत्न महागले
 • बुट महागले
 • चमड्याच्या किमंती वाढणार

या वस्तु झाल्या स्वस्त –

 • नायलाॅन चे कपडे स्वस्त होणार
 • स्टील ची भांडी स्वस्त होणार
 • पेंट स्वस्त होईल
 • ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार
 • पाॅलिस्टर चे कपडे स्वस्त
 • सोलर लालटेन स्वस्त होणार
 • सोने-चांदी स्वस्त होणार

टॅबलेटवर वाचण्यात आले बजट –

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी इतर वेळेपेक्षा वेगळ्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्प कागदा ऐवजी टॅबलेटवर सादर केला. यावेळचा अर्थसंकल्प कागदावर प्रिंट करण्यात आला नाही. अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी डिजिटल स्वरूपात उपलब्ध केला जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.