गणवेश योजनेसाठी निधी वितरीत

मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकास मंजुरी

 

पुणे – समग्र शिक्षा अंतर्गत 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार निधीही जिल्ह्यांना वितरीत केला आहे.

इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळाही आगामी कालावधीत सुरु होण्याची शक्‍यता आहे. गणवेश पात्र लाभार्थ्यांना वाटपाच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून कार्यवाही करणे सुलभ व सोयीचे व्हावे याकरिता निधी उपलब्ध करून देणे आवश्‍यक होते. अनुदानाची अखर्चित रक्‍कम विचारात घेऊन गणवेश पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निधी प्राप्त होताच उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणवेशाच्या दर्जाच्या नियंत्रण ठेवण्यासाठी काही नमुना तपासणी करणे आवश्‍यक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करावा. गणवेश योजनेवर झालेल्या खर्चाची माहिती संगणक प्रणालीवर नोंदवावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी यांनी बजाविले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.