अफगाणीस्तानमध्ये गुरूद्वारावर दहशतवादी हल्ला; 11 जणांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये शिख समाजाच्या गुरूद्वारावर अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंधाधूंद गोळीबार आणि आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान 11 भाविक मरण पावले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अल्पसंख्यांक समाजावर केलेला हा अलीकडच्या काळातील सर्वात भयानक हल्ला आहे.

सकाळी पावणे आठच्या सुमारास शोरबझार येथील गुरुद्वारावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी गुरूद्वारात सुमारे 150 भाविक होते. त्यात किमान 11 जण मरण पावले. तर 11 जण जखमी झाले. हल्लेखोराने धर्मशाळेवर हल्ला केला होता, असे टोलो न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. तीन हल्लेखोरांशी सुरक्षा दलाची चकमक अद्याप सुरू आहे. तर एक हल्लेखोर मरण पावला आहे. या हल्ल्याचा प्रतिकार विदेशी फौजाही करत असल्याचे वृत्त आहे.

या गुरुद्वारातून 11 मुलांची सुटका करण्यात आल्याचे काबूल पोलिसांनी सांगितले. शिख लोकप्रतिनिधी नरेंद्रसिंग खालीसा म्हणाले, हा हल्ला झाला त्यावेळी सुमारे 150 भाविक गुरूद्वारात प्रार्थना करत होते. या देवस्थानातील पहिला मजला अफगाणी फौजांनी मोकळा केला आत्मघाती बॉम्बर्सचा प्रतिकार सुरक्षा दले करत आहेत, असे अफगाणीस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अन्वर यांनी सांगितले.

या हल्ल्यात सहभाग असल्याची शक्‍यता मुख्य दहशतवादी संघटना तालिबानने फेटाळून लावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.