जळोची : बारामती येथील जळोची भागात मंगळवार दि.७ रोजी, एका विहरी मध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर पुरुष अंदाजे ४१ वर्ष असून अंगात, काळ्या रंगाची जीन्स पँन्ट व पांढरा शर्ट आहे .उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटात अंगठी घातलेली आहे.
सदर पुरुषाचा मृतदेह, सिल्व्हर ज्युबली उपजिल्हा, रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. या मृतदेहासंबंधी काही माहिती असल्यास, बारामती पोलिस ठाण्यामध्ये ०२११०-२२४३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.