दुर्दैवी ! केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात ; पत्नीचा मृत्यू

अपघातात स्वीय सहाय्यकाचा मृत्यू

अंकोला : केंद्रीय केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात झाला आहे.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली आहे.

श्रीपाद नाईक पत्नीसह देवदर्शनासाठी गेले होते. काल त्यांनी धर्मस्थळ आणि कोल्लुर येथील मंदिरात पूजा केली. आज सकाळी येलापूर येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनर ते गोकर्ण येथे जाणार होते. गोकर्ण येथे ते सकाळी पूजा करणार होते. त्यानंतर ते गोव्याला येणार होते. सोमवारी सकाळी 7-7.30 च्या दरम्यान त्यांचा कारचा भीषण अपघात झाला. पत्नी विजया नाईक यांचा जागीच मृत्यू झाला.

श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर असून ते अजूनही बेशुद्ध आहे. अपघातानंतर श्रीपाद नाईक यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुढीस उपचारासाठी त्यांना गोव्याला हलवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. गरज पडली तर नाईक यांना उपचारासाठी दिल्ली येथे नेण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.