मंचर – एकलहरे (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक रस्त्यावर डिव्हायडरला मोटर सायकलची धडक बसून एकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी पेंढार येथे मुलाच्या पहिल्याच वाढदिवसासाठी जात असताना हा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे अमृत संजय इगवले (वय 35, रा.दिडघर नसरापूर, ता. भोर) यांचा मुलगा व पत्नी राहत आहे.
मुलगा वेदांत याचा वाढदिवस असल्याने अमृत इगवले हे मोटारसायकल (एमएच 14 सीआर 7579) वरून नसरापूर येथून पिंपरी पेंढार येथे जात होते. एकलहरे गावाच्या हद्दीत बायपास रस्त्यावरील डिव्हायडरला मोटारसायकल धडकल्याने यांचा अपघात झाला.