मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.
अशातच आज बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांनी कंगनाची कार्यालयाचा काही भाग अतिक्रमण असल्याचे सांगत पाडला.
दरम्यान, या प्रकरणाबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“हे प्रकरण कंगना किंवा बीएमसीबाबत नाहीये. हे प्रकरण आहे, हिंदुत्ववादी विचारधारेचे समर्थन करणाऱ्यांना टार्गेट करण्याचं, अन् बाकीच्यांना सोडून देण्याचं. दुर्दैवाने या कळपाचे नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेना करत आहे.” अशी टीका राणे यांनी केली.
It’s not even about Kangana n BMC!
It’s abt any1 who is talking or supporting Hindutva are the target..
While OTHERS r spared!
Unfortunately Balasaheb’s ShivSena is leading the pack..SAD!— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2020
तत्पूर्वी, बीएमसीच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.