सविंदणे (अरुणकुमार मोटे) : आतापर्यंत आपण बहिणीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडनी देवून पत्नीचा जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू , किडनी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
करडे ता. शिरूर येथील रहिवाशी व कारेगावच्या शिक्षिका चंदाराणी शिवाजीराव वाळके यांचे वयाच्या ५२ वर्षी आजाराने दुःखद निधन झाले आहे. दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांचे पती शिवाजीराव वाळके हे शिक्षक संघटनेत पदाधिकारी असून त्यांनी अनेक वर्ष पत्नीच्या आजारासाठी डॉक्टरकडे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पत्नी च्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने आजार आटोक्यात येइना शेवटी आजार आटोक्यात न आल्याने त्यांनी स्वतः ची किडनी पत्नीला द्यायचे ठरवले.
डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर शस्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. पत्नीचे प्राण वाचवून स्वतः ची किडनी देवून त्यांनी पत्निधर्म निभवला.समाजासमोर आदर्श ठेवून एकमेव आदर्श पती चे उदाहरण म्हणून समाजासमोर आहे. पती शिवाजीराव वाळके यांनी पत्नी ला एक किडनी देवून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला. परंतु दि. ३० नोव्हेबर रोजी पत्नीचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व भाऊ आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.