बेरोजगारांसाठी नोकरीची संधी

28 व 29 ऑक्‍टोबर रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा

 

पुणे – खासगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्‍यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या पुणे विभागीय आयुक्‍तालय या कार्यालयामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्‍टोबर रोजी आयोजन करण्यात येणार आहे.

यात उद्योजकांमार्फत अधिसूचित केलेल्या रिक्‍त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखती होणार आहेत. ऑनलाइन मेळाव्यात उद्योजकांनी त्याच्याकडील रिक्‍तपदे “महास्वयंम’ वेबपोर्टलवर अधिसूचित केलेली आहेत.

उद्योजकांमार्फत उमेदवारांच्या दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा प्रत्यक्ष मुलाखती घेवून रिक्‍त जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरीता नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या विभागीय आयुक्‍तालयाचे उपायुक्‍त श. बा. अंगणे यांनी आवाहन केले.

 

सहभागी होण्याकरीता

https://rojgar.mahaswayam.gov.in

या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करावी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.