नगर – कॉंग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.या पार्श्वभूमीवर नगर कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आ. थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.
काळे म्हणाले की, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल, गॅसचे सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर गेलेले दर यामुळे जनता हवालदिल आहे.राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकांचा निकाल हा कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारा आहे. मात्र सध्याच्या पक्षांतर्गत राजकीय स्थितीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. थोरात यांची लवकरच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही भेट घेणार आहोत. आ.पटोले यांच्याशी देखील संवाद करणार आहोत. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 15 फेब्रुवारीला पक्षाच्या मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पाटील यांच्याबरोबर चर्चा करणार आहे.