अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा करोनाने मृत्यू?

लाहोर – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा करोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन करोना पॉझिटिव्ह आढळली होती. मात्र सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. अनेक सोशल साईट्‌सवर दाऊदच्या मृत्यूचे वृत्त प्रसिद्ध होत आहे.

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी मेहजबीन करोनाची लागण झाल्याचे वृत्त कालच सर्वत्र आले होते. पकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात होते. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे या वृत्ताद्वारे सांगण्यात आले. मात्र आज त्याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोना संसर्गाने पाकिस्तानातही पाय पसरले आहेत. करोनाची लागण दाऊदच्या सुरक्षा रक्षकांना आणि त्यानंतर दाऊद आणि त्याच्या पत्नीलाही झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दाऊदला कराचीतील मिलिट्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मीडियात पसरली.

Leave A Reply

Your email address will not be published.