अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त खोटे

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन  छोटा राजन याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, शुक्रवारी छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त खोटे असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे. छोटा राजनला तिहार तुरुंगात करोनाची लागण झाली होती.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली होती. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली.

मुंबईतलं राजनविरोधातील हे खंडणीचं तिसरं प्रकरण होतं, ज्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.