पाटण तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे खंडीत 47 गावाचा वीज पुरवठा पूर्ववत करा

पालकमंत्री विजय शिवतारे

सातारा  –अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ करावे, पाटण तालुक्‍यातील 47 गावांमध्ये विज पुरवठा सुरु करण्यासाठी युध्द पातळीवर काम करावे तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजना पुरामुळे नादुरुस्त झाली आहे त्या दुरुस्त करुन अतिवृष्टीबाधितांना दिलासा देण्याचे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.

पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पाटण येथील पूरग्रस्त्‌ बाधित झालेल्या भागांची पहाणी केली. त्यानंतर आयोजित केलल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार शुंभराज देसाई, आमदार सुनिल प्रभु, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, हिम्मत खराडे, तहसिलदार रामहरी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे शाळांचे नुकसान झाले आहे. या शाळांची तपासणी करुन नुकसानीचा अहवाल शिक्षण विभागाने सादर करावा. नदीवरील उपसा सिंचन योजना सहकारी तत्वावर सुध्दा चालविल्या जातात. या उपसा सिंचन योजना अतिवृष्टीमुळे आता बंद पडल्या आहेत. या योजना सुरु करण्यासाठी त्यांना निधीची आवश्‍यकता आहे. या योजना मदत व पुर्नवसन योजनेंतर्गत बसविण्यासाठी तसा पस्ताव द्यावा.

पाटण तालुक्‍यातील 47 गावांचा विज पुरवठा सुरु करण्यासाठी मनुष्यबळ जर कमी पडत असेल तर इतर तालुक्‍यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग करावेत. पाटण तालुक्‍यातील 9 गावांचे भूसख्लन झाले आहे तेथील नागरिकांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात यावी. तसेच त्यांचे कायमचे पुर्नवसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. पुरामुळे लोकांचे पशुधन पाण्यात वाहून गेले आहे. पशुसंवर्धन विभागांनी वरिष्ठांशी चर्चा करुन या पुशुपालकांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.

पाटण शहराचा डिपी प्लॅन करण्याचे काम सुरु आहे. पाटण शहराला वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होते ती पूरपरिस्थिती का निर्माण होते याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी व त्यांच्याकडून तसा अहवाल घ्यावा. या कामासाठी आवश्‍यक तो निधी दिला जाईल. तसेच ओढया नाल्यांवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत त्यांना तात्काळ नोटिसा द्या. अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

यावेळी  आमदार शंभुराज देसाई म्हणाले की, पुरामुळे पशुधन वाहून गेले आहे. त्यांना पशुसंवर्धन विभागाने योग्य ती मदत करावी. अतिवृष्टीमूळे शाळांनाही फटका बसला आहे. ज्या शाळांच्या खोल्या धोकादायक आहेत अशा खोल्यांमध्ये शाळा भरवू नयेत तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अहवाल तात्काळ सादर करावा. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्यांटीची पहाणी करताना लोकप्रतिनिधींनाही सोबत घ्यावे अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here