बांधकाम कामगारांच्या योजना मार्गी लावा : आ. कोल्हे 

कोपरगाव  – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना असून, त्यांच्या लाभासाठी आवश्‍यक त्या सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडे सादर केले. पण ते प्रलंबित आहेत. ते तातडीने मार्गी लावावेत, या मागणीचे निवेदन कामगारमंत्री संजय कुटे यांना आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले.

सध्या मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आ. कोल्हे यांनी विधान भवनात मंत्री कुटे यांची भेट घेतली. याप्रसंगी सादिक पठाण, ज्ञानेश्‍वर रोकडे, सुधाकर क्षीरसागर, प्रताप केणे, नारायण गवळी आदी उपस्थित होते. आ. कोल्हे म्हणाल्या, शासनाने नोंद केलेल्या बांधकाम कामगारांना आवश्‍यक अवजारे, अटल विश्‍वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत प्रस्ताव, शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना व सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचे प्रस्ताव आवश्‍यक त्या कागदपत्रांसह सहायक कामगार आयुक्तांकडे दाखल केले आहेत.

त्यासंदर्भात अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. तरीही हे प्रस्ताव मार्गी लागत नाहीत. तेंव्हा याकामी कामगार मंत्री या नात्यांने लक्ष देवुन ते मार्गी लागण्यांसाठी संबंधितांना आदेश करावेत, अशी मागणी आ. कोल्हे यांनी केली. त्यावर कामगारमंत्री संजय कुटे यांनी लक्ष घालून हे सर्व प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत म्हणून सहायक कामगार आयुक्तांना आदेश करावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.