…अन् कोविड बधिताला चक्क बाईकवर बसवून नेलं रुग्णालयात

मुंबई –  करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे.  देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.

तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. मात्र अशा कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे.

केरळ येथे चक्क कोविड वॉलेंटियर्सने कोरोनारुग्णाला बाईकवर बसवून रुग्णालयात नेलं आहे सध्या त्यांचा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, केरळ मधील अलप्पुझा जिल्ह्यातील असून पुन्नापारा गावात घडली आहे. एका कोरोना रुग्णाची स्थिती गंभीररित्या बिघडली त्याला श्वास घेण्यास देखील त्रास होऊ लागला अशा वेळी  अश्विन कुंजुमोन आणि रेखा पुन्नापारा डोमेसाइल  या दोघांनी  ॲम्ब्युलन्सला फोन लावला. पण ॲम्ब्युलन्सला पोहोचण्यात उशीर लागणार होता. अशा वेळी स्वःताच्या जीवाची पर्वा न करता या दोघांनी  रूग्णाला बाईक वर बसवून 100 मीटरच्या अंतरावर असणार्‍या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या वॉलेंटियर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वॉलेंटियर्सच्या या धाडसी कामगिरी बद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वॉलेंटियर्सचे कौतुक केलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.