थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध

संगमनेर  – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. थोरात यांच्या पॅनेलविरोधात उमेदवार देण्यात थोरात विरोधकांना सपशेल अपयश आले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची निवडणूक मार्चमध्ये होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज मगे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. सुरुवातीपासूनच एकतर्फी असलेल्या या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहींची राजकीय साथ देखील मिळाली.

मात्र निवडणूक झाल्यास मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ज्या काही विरोधकांनी उमेदवारी करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांनी आपले अर्ज मागे घेतले.दरम्यान सकाळीच मंत्री थोरात यांनी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांची यादी अंतिम केल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात सर्व इच्छुकांना बोलावत याची माहिती देण्यात आली.
अंतिम यादी निश्‍चित झाल्यानंतर उर्वरित सर्व इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध निवड झालेले संचालक
साकूर गट- इंद्रजित थोरात, इंद्रजित खेमनर, मिनानाथ वर्पे, जोर्वे गट- बाबा ओहोळ, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, तळेगाव गट- संपत गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, धांदरफळ गट- रमेश गुंजाळ, विनोद हासे, अनिल काळे, अकोले, जवळेकडलग गट- चंद्रकांत कडलग, संतोष हासे, भास्करराव आरोटे, सोसायटी संस्था- बाळासाहेब थोरात, भटक्‍या विमुक्त जमाती- गणपत सांगळे, महिला मतदारसंघ- मीराबाई सुधाकर वर्पे, मंदा शेखर वाघ, अनुसूचित जाती-जमाती- माणिक दाजीबा यादव, इतर मागासवर्गीय गट- अभिजित ढोले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.