राज्यात अस्थिरता असतानाही मंत्र्यांकडून बेताल वक्तव्ये !- शरद पवार

कोल्हापूर: “मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने यातून त्वरित तोडगा काढण्याची गरज असतानाही मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी चार वर्षे काढली आणि त्यानंतर बेताल वक्तव्ये केली. आगीत तेल टाकण्याचे काम एकाप्रकारे विविध माध्यमातून केले गेले.”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

“संसदेत ठराव करताना विरोधी पक्षांची मदत लागल्यास त्यांच्याशी समन्वय साधून पुढाकार घेण्यास मी तयार आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी याबाबतची भूमिका वेळोवेळी संसदेत मांडली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी लागेल ती मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, पण हा तिढा त्वरित सुटायला हवा”. असे शरद पवार म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील समाचार घेतला. “कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी फोन रेकॉर्डिंगबद्दल असेच वक्तव्य केल्याचे मला कळले. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे ते संभाषण आहे हे स्पष्ट व्हायला हवे. ही परिस्थिती चिघळायला अशा प्रकारची वक्तव्ये जबाबदार आहेत”.

महाराष्ट्रात वारीला एक परंपरा आहे. मोठ्या उत्साहात व शांतीपूर्ण भावनेने अनेक वर्षांपासून वारी निघते. वारीत कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा इतिहास नाही. अशात वारीमध्ये साप सोडले जातील, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होईल असे वक्तव्य राज्यप्रमुखांकडून केले गेले. त्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला आणि परिस्थिती बिघडल्याचे शरद पवार म्हणाले.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1023117267960295425

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)