स्लेजिंगबद्दल कर्णधार पेनीची बिनशर्त माफी

सिडनी – सिडनीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी व रवीचंद्रन अश्विन यांना स्लेजिंग केल्याप्रकरणी टीका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनी याला आपल्या चुकांचा साक्षात्कार झाला असून त्याने भारतीय संघाची माफि मागितली आहे.

विहारी व अश्‍विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढत हा सामना अनिर्णीत राखला. ही जोडी फोडण्यासाठी पेनी याने स्लेजिंगही करुन पाहिले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट पेनीवरट प्रचंड टीका सुरु झाली. या सामन्यातील माझे वर्तन अत्यंत लज्जास्पद होते. भविष्यात असी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. सोमवारचा दिवस माझ्याआयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता. यष्टीमागेही मला सरस कामगिरी करता आली नाही. तसेच माझ्याकडून विहारी व अश्‍विन यांना त्रासही झाला, त्यासाठी मी माफि मागत आहे, असे पेनीने आपल्या माफिनाम्यात म्हटले आहे.

स्टंप माइक ब्रॉडकास्टचाच एक भाग आहे. त्यामुळेच चाहत्यांना आम्ही मैदानावर काय बोलतो ते ऐकू येत असते. अश्विनला उद्देशून मी चुकीच्या शब्दाचा वापर केला. हे पुन्हा घडणार नाही, असेही पेनी म्हणाला.

अश्‍विनचेही चोख प्रत्युत्तर 

अश्विनची एकाग्रता भंग करण्यासाठी पेनीने यष्टीमागून त्याला उदेदेशून स्लेजिंग केले. मात्र, त्याचा अश्‍विनवर काहीही परिणाम झाला नाही. पेनीच्या वक्तव्यावर अश्‍विननेही त्याचे तोंड बेद करणारे उत्तर दिले. आम्ही आता चौथ्या कसोटीसाठी सज्ज होत आहोत. मात्र, तुझी ही अखेरची मालिका असेल ना. तू भारतात ये मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. तो तुझा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल, असे त्याच भाषेत अश्‍विनने पेनीला प्रत्युत्तर दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.