शिक्षक बदली प्रक्रियेत अनियमिता : आंदोलनाचा इशारा

बारामती तालुका शिक्षक संघाचा आरोप

मुर्टी – पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रविवार (दि. 16) पासून संगणकीय प्रणालीद्वारे झाल्या. यामध्ये अनियमितता झाल्याचे दिसून येते. यामुळे ते पण वर्षे पूर्ण असणाऱ्या विविध वा शिक्षिकेवर अन्याय झाला असल्याचा आरोप बारामती तालुका शिक्षक संघटनेने केला आहे.

बारामती तालुक्‍यात 37 जागा रिक्‍त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये तफावत दिसून येत आहे. स्तरानुसार शिक्षक बदली अपात्र प्रकार दिसून येतो पती पत्नी एकत्रिकरणाचे अंतर कशाप्रकारे मोजणार यांचे स्पष्ट निर्देश नाहीत, अशी माहिती बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, राज्य सरचिटणीस केशव जाधव, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी या त्रुटीबाबत बारामती पंचायत समिती व पुणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली. तसेच जिल्हा परिषदेने दुटप्पी भूमिका घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही दिला आहे.

शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शिक्षकांच्या या बदल्यामध्ये संवर्ग एकमध्ये समाविष्ट शिक्षकांना बदलीस प्रथम प्राधान्य देणे घ्यावे आहे; परंतु संवर्ग एकमधील प्राधान्याने मागितलेले शाळेऐवजी संवर्ग चारमधील शिक्षकास मिळाली आहे, त्यामुळे 53 वर्षे पूर्ण असणाऱ्या विधवा शिक्षकांवर अन्याय झाला आहे. जिल्हास्तरीय सर्व तालुक्‍यात समप्रमाणात रिक्‍त जागा राहाव्यात या हेतूने जिल्हा परिषदेने सामानी करणाचा निर्णय घेतला होता. धोरणानुसार बारामती तालुक्‍यात 37 जागा रिक्‍त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोणत्या शाळा अनिवार्य आहेत याची यादी जिल्हा परिषदेने प्रक्रिया सुरू होण्य आगोदरजाहीर केली होती. त्यामुळे अशा शाळा बदलीपात्र शिक्षकांना मागता येणार नव्हत्या; परंतु अशा शाळांना शिक्षक मिळाले याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. शाळा शिक्षकांना मिळाल्या. ही बाब निदर्शनास आणून दिली आहे मात्र, याबाबत दुहेरी भूमिका अवलंबल्याने आंदोलनाचा पर्याय अंवलबवावा लागेल असे निवेदनात नमूद केले आहे.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये झालेल्या ज्या त्रुटी दर्शविल्या आहेत. ऑनलाइनमध्ये झालेल्या त्रुटींमध्ये पूर्तता करण्यासाठी आमचे कार्यालयांकडून जिल्हा कार्यालयांला त्रुटींमध्ये दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.

– संजय जाधव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पं.स.

Leave A Reply

Your email address will not be published.