जळोची… व्याजाच्या पैशाची मागणी करत अनाधिकाराने सावकाराने घरात घुसत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सावकारावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष दिनकर खोमणे रा.को-हाळे बु.ता.बारामती जि. असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, वरील आरोपीकडे सावकारकीचा कसलाही परवाना नसताना त्याने फिर्यादीस वीट भट्टी व्यवसाय करिता एक लाख रुपये व्याजाने दिले होते. त्या बदल्यात फिर्यादीचे पती सावकाराला वेळोवेळी व्याजाची रक्कम देत होते तरीसुद्धा सदर सावकार फिर्यादीच्या घरी जाऊन पतीकडे वेळोवेळी व्याजाच्या पैशाची मागणी करीत होता.
दिनांक 18 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सदर सावकाराने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून दोन्ही हातानी कवळ मारुन जवळ ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादीच्या डाव्या गालावर चापट मारुन ,डोक्याचे केस आवडत असताना फिर्यादीला तिच्या पती व पुतण्या आले. यावेळी सावकाराने पतीस शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सावकारावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भादवी क.452,354,354अ, 323,504, 506 सावकारी अधिनियम 39,45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोसई शेलार करीत आहेत.