महावितरणकडून अनधिकृत वीज वापरणाऱ्या

शहरातील केवळ 20 मंडळांनीच घेतले होते अधिकृत वीज जोड
सहा मंडळांवर कारवाई 

पिंपरी – गणेशोत्सवादरम्यान अनधिकृत वीज वापरणाऱ्या सहा गणेश मंडळावर महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी मंडळाना स्वस्त दरात वीज पुरविण्यात येत होती. अधिकृत तातुरते वीज जोड घ्यावे, असे महावितरणकडून आवाहनही करण्यात आले होते. परंतु केवळ 20 मंडळांनीच अधिकृत वीज जोड घेतले आणि उर्वरित शेकडो मंडळांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यापैकी केवळ सहा मंडळांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणाच्या आवाहनाला बिल्कुलच दाद न देता काही मंडळांनी अनधिकृतरित्या घरगुती वीज जोडणीमधून वीज वापरली. याच कारणामुळे महावितरण प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील सहा मंडळांना कायदेशीर दंड ठोठावला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दीड हजाराहून अधिक गणेश मंडळे आहेत. मात्र, त्यापैकी 20 मंडळांनीच अधिकृत महावितरणकडून परवानगी घेतली होती. मात्र, बहुसंख्य मंडळानी अनधिकृतरित्याच लाईट वापरली होती.

याच काळात महावितरणकडून कारवाईबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तिकडे दुर्लक्ष करत गणेश मंडळांनी अनधिकृतरित्या वीज वापरली यावर महावितरणच्या पथकाने कारवाई करत खराळवाडी येथील 2, पिंपरी कॅम्प 2, सांगवी 1 व चिंचवड येथील 1 मंडळावर कारवाई केली. कारवाई केल्याची माहिती पिंपरी महावितरण शाखेचे अभियंता शिवाजी वायफळकर यांनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.