बारामती, इंदापूर, भोर, खेड तालुक्यात कडकडीत बंद
महाविकास आघाडीतील तीन पक्षांकडून सहभाग
बारामती (प्रतिनिधी)- लखीमपूर येथे हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बारामती शहर व तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दिवसभर सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बारामती शहरातील मार्केटयार्ड याठिकाणीही अन्नधान्य व भाजीपाल्याचे लिलाव बंद ठेवले होते. बारामती शहरातील मंडईमधील व्यावसायिकांनी सहभाग घेतला. शहरातील तसेच तालुक्यातील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे शहरात शुकशुकाट होता. दरम्यान भिगवण चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख ऍड. राजेंद्र काळे, माजी जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण- पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राहुल कदम, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र काटे,
नगरसेवक बिरजू मांढरे, समीर चव्हाण, संतोष गालिंदे, माजी नगरसेवक अभिजीत काळे, नितीन बागल, विशाल जाधव, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कवळे, तुषार हिडडे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, शिवसेनेचे सतीश कोट्, पप्पू माने, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. अशोकराव इंगुले, वीरधवल खाडे, रोहित बनकर, सूरज भोसले, योगेश महाडिक, पदाधिकारी उपस्थित होते.