#IPL2020 : …म्हणून भारतीय पंच अनिल चौधरी अडकले वादात

डीआरएसच्या नियमभंगामुळे कारवाईची शक्‍यता

दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील भारतीय पंच अनिल चौधरी वादात अडकले आहेत. डीआरएसच्या नियमाचा भंग केल्यामुळे आता त्यांच्यावर आयपीएल समिती व बीसीसीआय कठोर कारवाई करण्याची शक्‍यता आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला डीआरएस घेऊ नको असा इशारा चौधरी देत असल्याचे कॅमेरातून स्पष्ट झाल्याने ते अडचणीत आले आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने दिल्लीच्या रवीचंद्रन अश्‍विनविरुद्ध जोरदार अपील केले होते. पंच चौधरी यांनी त्याला नाबाद ठरवले होते. मात्र, त्यावेळी डीआरएस घेण्याबाबत शर्माने कर्णधार वॉर्नरशी संवाद साधला. त्यावेळी पंच चौधरी यांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या हाताच्या बोटांनी दोनवेळा टॅप केले व चेंडू बॅटला लागून पॅडवर आदळल्याचे संकेत दिले. त्यांचा इशारा समजून घेत वॉर्नरने डीआरएस घेतला नाही.

डीआरएसच्या नियमानुसार खेळाडू किंवा पंच तसेच अन्य कोणत्याही व्यक्‍तीला हस्तक्षेप किंवा इशारे देता येत नाहीत. पंच चौधरी यांनी याच नियमाचा भंग केल्याने आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.