विश्‍वचषक स्पर्धेत खेळू शकतो – उमेश यादव

चेन्नई – 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्‍वचषकासाठी भारतीय संघाची निवड अद्याप झालेली नाही. एका जागेसाठी संघात अजूनही विचार सुरू असल्याचे विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या अखेरच्या सामन्यात नमूद केले होते.

यादरम्यान उमेश यादवने, स्वतःला विश्‍वचषक स्पर्धेसाठीच्या संघात अतिरीक्त गोलंदाजाच्या भूमिकेसाठी आपण योग्य उमेदवार असल्याचे म्हणले आहे. विश्‍वचषकात निवड होण्यासाठी आयपीएल हे व्यासपीठ असेल तर मी यासाठी योग्य उमेदवार असून चौथा गोलंदाज मीच असेल असेही त्याने नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.