उमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र

जेंव्हा खरे पती-पत्नी पहिल्यांदा एकत्र काम करतात, तेंव्हा नक्‍कीच त्याबद्दल उत्सुकता वाढलेली असते. उमेश कामत आणि प्रिया बापट या रिअल लाईफ पार्टनरनी आतापर्यंत पडद्यावर एकत्र काम केलेले आठवत नाही. पण आता “आणि काय हवं’ या नवीन वेबसिरीजमध्ये हे दोघेही पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. तब्बल 7 वर्षांनी हे दोघेजण एकत्र काम करणार आहेत. “मुरंबा’च्या वरुण नार्वेकरने ही वेबसिरीज डायरेक्‍ट केली आहे. लग्नामध्ये दररोज ऍडजस्टमेंट करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याची ही कथा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)