मुंबई – आपल्या अदाकारीने आणि डायलॉग डिलिव्हरीने अभिनेता ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ कायमच प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. नवाज ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतो, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतो. नुकतंच नवाजुद्दीन मुंबईच्या बॉलिवुड मधून उत्तरप्रदेशातील आपल्या बुधना या मूळ गावी पोचलेला आहे.
करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचं शुटिंग, तसेच सगळेच कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत. मात्र, नवाजुद्दीन आपला सर्व वेळ शेत कामात घालवत आहे. नवाजुद्दीननं पिकाला पाणी देत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो पिकाला पाणी देताना दिसत आहे. तसंच दिवसभराचं काम संपवलं, असंही नवाजुद्दीननं म्हटलं आहे.
Done for the day !!! pic.twitter.com/1oXDUS4E8m
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) June 22, 2020