UK’s crackdown on illegal immigrant | डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत परतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने ब्राझील, भारत, मेक्सिकोसह अनेक देशातील नागरिकांना परत मायदेशी पाठवले आहे. आता ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल टाकत ब्रिटनने देखील अशीच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यात ब्रिटनने जवळपास 19 हजार बेकायदेशीर स्थलांतरित आणि गुन्हेगारांना देशाबाहेर काढले आहे.
ब्रिटनमध्ये लेबर पार्टी सत्तेवर आल्यापासून जवळपास 19,000 बेकायदेशीर स्थलांतरित आणि गुन्हेगारांना डिपोर्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारने या लोकांना मायदेशी परत पाठवत असल्याचा एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांना शोधण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
The public must have confidence in the UK’s immigration system.
Through our Plan for Change, we have removed almost 19,000 people including failed asylum seekers, foreign criminals and immigration offenders from the UK since July 2024. pic.twitter.com/QY4tpQDqSP
— Home Office (@ukhomeoffice) February 10, 2025
या मोहिमेअंतर्गत भारतीय रेस्तरां, बार, स्टोअर्स आणि कार वॉशवरही छापे मारण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतरित काम करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जानेवारी महिन्यातच जवळपास 828 ठिकाणी केलेल्या छापेमारीत 609 नागरिकांना अटक करण्यात आले. हंबरसाइड येथील एका भारतीय रेस्तरांमध्ये छापा टाकून 7 लोकांना अटक केली करण्यात आले होते. ब्रिटिश सरकारकडून देशात बेकायदेशीरपणे आश्रय घेणारे, कोणतीही परवानगी न घेता राहणारे, तसेच गुन्हेगार यांना परत मायदेशी पाठवले जात आहे.
दरम्यान, ब्रिटिश संसदेत नवीन विधेयक देखील सादर करण्यात आले असून, या विधेयकात सीमा सुरक्षा, आश्रय आणि अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या विधेयकामुळे संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यास मदत होईल, असे ब्रिटिश खासदारांचे म्हणणे आहे. याशिवाय, बेकायदेशीर स्थलांतरितांना नोकरी देणाऱ्या संस्थेवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी 1 हजार पेक्षा अधिक जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.