मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित होण्याबाबत ब्रिटन आशावादी

नवी दिल्ली – जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरला लवकरच संयुक्‍त राष्ट्राकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले जाईल, अशी आशा ब्रिटनने आज व्यक्‍त केली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी गटांविरोधात ठोस आणि अपरिवर्तनीय कारवाई केली जावी, अशी मागणीही ब्रिटनने केली आहे. ब्रिटनचे उच्चायुक्‍त सर डोमिनिट ऍस्किथ यांनी शुक्रवारी पत्रकारांबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमामध्ये ही भूमिका स्पष्त केली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुलवामाच्या हल्ल्यानंतरच्या घडामोडींमुळे निर्माण झालेला तनाव कमी व्हावा यासाठी ब्रिटनकडून सक्रिय प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

“ब्रेक्‍झिट’ पश्‍चात भारताबरोबरचे संबंध अधिक सुदृढ करण्यावर ब्रिटनकडून भर दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनकडून इमिग्रेशनचे निकष शिथील केले जातील, असेही ऍस्किथ यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात मसूदवर बंदी आणण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेने आणलेल्या प्रस्तावावर चीनने तांत्रिक स्थगिती आणली होती. मात्र अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले जावे, याचे ब्रिटनकडून जोरदार समर्थनच केले जाते, असेही ऍस्किथ यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.