लंडन – ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेने आजपासून कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या लसीच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली.
ऑक्सफर्डमध्ये जन्म झालेल्या आणि डायलेसिसवर असलेल्या 82 वषीय ब्रायन पिंकर या रुग्णाला सर्वप्रथम या लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या रुग्णलयाच्या प्रमुख परिचारिकेने ही लस सर्वप्रथम टोचली. ब्रिटनमध्ये यापूर्वी फायझर-बायोएन्टेक लसीलाही आपत्कालिन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे.
ब्रायन पिंकर हे निवृत्त मेंटेनन्स मॅनेजर गेल्या अनेक वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या हॉस्पिटलमध्ये डायलेसिस करत आहेत. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम कोविड-19 विरोधी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
लस घेतल्यानंतरही आपले उपचार सुरूच ठेवता येऊ शकणार असल्याने पिंकर यांनी आनंद व्यक्त केला. ही लस घेतल्यानंतर आपल्याला आपल्या लग्नाचा 48 वा वाढदिवस अधिक उत्साहाने साजरा करावा असे वाटायला लागल्याचे त्यांनी सांगितले.