पळसदेव – उजनी धरणातील पाण्याची पातळी एकदम कमी झाली आहे. मात्र, सध्या भीमा नदी पात्रात पाऊस झाल्याने भीमा नदीत पाणी येत आहे. या पाण्याबरोबर नदी पात्रात टाकलेली घाण केमिकल पाण्याबरोबर वाहत येत आहे. नदीचे पाणी दूषित असल्याने नदीतील मासे भुलून नदी काठी येत आहेत. यातच पळसदेव येथील बळीराम भोई यांना आठ किलोचा दुर्मिळ आहेर जातीचा मासा सापडला.
भिगवण मच्छी मार्केटमध्ये या माशाला 1 हजार 500 रुपये किलो असा भाव मिळाला. एका माशाचे 12 हजार रुपये मिळाले असल्याचे बळीराम भोई यांनी सांगितले. औषधी गुणधर्म असलेला आहेर जातीचा मासा उजनी धरणात एकदम कमी प्रमाणात आढळून येतो. भीमा नदीचे पाणी कमालीचे दूषित झाल्याने पाण्यातील मासे गुंगी येऊन किनाऱ्याला येत आहेत. त्यामुळे सध्या मच्छिमारांना मोठ्या संख्येने मासे मिळत आहेत.