उज्ज्वल निकम यांचा बायोपिक “निकम’ लवकरच

मुंबई : विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्यावरील बायोपिक लवकरच येणार आहे. “ओह माय गॉड’चे डायरेक्‍शन करणाऱ्या उमेश शुक्‍लाकडेच या सिनेमाच्या डायरेक्‍शनची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्या सिनेमाचे शिर्षक “निकम’ असे असणार आहे.

1993 चे साखळी बॉम्बस्फोट, 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, टी सिरीजच्या गुलशन कुमार यांची हत्या आणि भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येसारख्या हायप्रोफाईल खटले ऍड. उज्ज्वल निकम यांनी चालवले होते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भावेश मंडालिया आणि गौरव शुक्‍ला हे या सिनेमाची कथा लिहीणार आहेत. ऍड उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर सिनेमा अथवा पुस्तक काढण्याचा वारंवार आग्रह केला जात होता.

मात्र निकम यांनी मात्र त्यात रस दाखवला नव्हता. आपल्या पक्षकारांमध्ये आपली छबी बिघडू नये, अशी काळजीही त्यांना वाटत होती. मात्र आता प्रतिभावान टीमच्या हाती आपल्या बायोपिकचे भविष्य सुरक्षित आहे, असा विश्‍वास त्यांना वाटतो आहे. अजून “निकम’मध्ये ऍड. उज्ज्वल निकम यांच्या मध्यवर्ती रोलमध्ये कोण कलाकार असणार हे निश्‍चित झालेले नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.