सोलापुर – सोलापुर जिल्ह्याची जिवनदायीनी असलेलं उजनी धरण १००% भरले त्याच पार्श्वभूमी आज (दि. २) करमाळा ढोकरी येथे सोलापुर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आलं. यावेळी संपुर्ण जिल्हा वासियांच्या आनंदात सामील होऊन याठिकाणी खन- नारळ अर्पण करून जलपुजन करण्यात आलं.
त्यावेळी जि.प. सदस्य सवितादेवी राजे भोसले, अजित दादा तळेकर, पं. स. सभापती गहिनीनाथ ननवरे, पं. स. उपसभापती दत्तात्रय सरडे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, माजी आमदार नारायण आबा पाटील सह पतसंस्थेचे चेअरमन धुळाभाऊ कोकरे, पंचायत समिती सदस्य अतुल भाऊ पाटील, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शहाजीराव देशमुख, ज्ञानेश पवार, भारत आरकिले तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.