पुणे – चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अकाउंटंट या पदव्यांना आता पदव्युत्तर पदवीची समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नेट परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही पदवी घेतलेले विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक बनू शकतील.
तसेच पीएचडी किंवा परदेशी विद्यापीठात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. “यूजीसी’च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पदव्यांना पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याचे परिपत्रक यूजीसीने प्रसिद्ध केले आहे.
जगात भारत वगळता सीए, सीएस किंवा आयसीडब्ल्यूए ही पात्रता पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष मानली जाते.