पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा देशभरात 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी 8 लाख 60 हजार 976 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 लाख 26 हजार 707 उमेदवारांनी ही परीक्षा दिली.
एकूण 81 विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या निकालापूर्वी “एनटीए’ने नेटच्या सर्व विषयांची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली होती. त्यानंतर या परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला.
अधिकृत संकेतस्थळावर ऍप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकून सबमीट केल्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येईल.