मोनॅको : युगांडाचा २३ वर्षीय धावपटू जोशुआ चेपतेगीने ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम रचला आहे. जोशुआने ५ हजार मीटरचे अंतर १२ मिनिटे ५१ सेंकदात पूर्ण केले.
यासह जोशुआने २७ सेंकदाने केनियाच्या रोनेक्स किप्रूतेचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वीचा विक्रम रोनेक्सच्या नावावर होता. त्याने १३ मिनिटे १८ सेंकद वेळ नोंदवून विश्वविक्रम रचला होता.
In the last 12 months @joshuacheptege1
• became world cross country champion
• won 5000m @Diamond_League final
• became 10,000m world champion
• set 10km WR of 26:38
• set 5km WR of 12:51In 2020 he says "I want to go and make history"
📰: https://t.co/f8NWbu40uP pic.twitter.com/C4bqkKf0sE
— World Athletics (@WorldAthletics) February 18, 2020
या स्पर्धेत जोशुआ चेपतेगी शिवाय फ्रान्सच्या जिमि ग्रेसियरने १३ मिनिटे १८ सेंकद वेळ नोंदवत दुसरे तर निक गोलब याने १३ मिनिटे २७ सेंकद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.
दरम्यान, जोशुआने डिसेंबरमध्ये १० किमी धावण्याच्या शर्यतीत २६:३८ वेळ नोंदवत केनियाच्या लियोनार्ड कोमोनचा विक्रम मोडीत काढला होता. कोमोनने २००९ मध्ये हा विक्रम रचला होता.