‘खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याला निवडून आणू’

रामराजेंसह आमदारांनी वाचला उदयनराजेंच्या तक्रारींचा पाढा

बारामतीत रंगली साताऱ्याच्या खासदारकीची खलबते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा:  बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या निवासस्थानी साताऱ्याच्या खासदारकीची गोपनीय खलबते सोमवारी रंगली. पवारांचा सातारा दौरा त्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची थेट साहेबांकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मोर्चबांधणी केल्याने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. खासदार उदयनराजे सोडून इतर कोणताही उमेदवार पक्षाने द्यावा, आम्ही त्याला निवडून आणतो, अशी मागणी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याने उदयनराजे व आमदार यांच्यातील टोकाचा आंतरविरोध पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बारामती येथे गोविंदबाग बंगल्यावर आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत तक्रारीचा पाढा वाचला. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील उपस्थित होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाच्या विरोधात आघाडी काढूनही सातारा विधानसभा मतदारसंघात तीन लाख मते पक्षाच्या उमेदवारांना मिळाली होती. त्यामुळे उदयनराजे पक्षाबरोबर नसतानाही त्यांनी सर्व विधानसभा मतदारसंघात चांगली मते मिळाली होती. याची आकडेवारीसह सर्व माहिती त्यांनी पवार यांच्यापुढे मांडली.

यावेळी शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही उदयनराजे यांच्याविषयी तक्रारी केल्या. आजपर्यंत आम्ही सर्वांनी त्यांना निवडून आणले. पण, ते पक्ष व आमच्याविरोधात भूमिका घेत आहेत. प्रत्येक वेळी ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांना अडचणीत आणत आहेत. पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाविरोधात टीका करत आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन सातारा लोकसभेसाठी उदयनराजे सोडून इतर कोणीही उमेदवार पक्षाने दिला तर आम्ही त्याला निवडून आणतो. या मागणीचा विचार व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी पवार यांच्यापुढे मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)