नेहा कक्कड बनणार उदित नारायणची बहू

पार्श्‍वगायक उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण आणि नेहा कक्कड यांचे लग्न ठरले आहे. हे दोघेजण 14 फेब्रुवारीला लग्न करण्याची शक्‍यता आहे. स्वतः आदित्य नारायणने यासंदर्भातील माहिती दिली गेली आहे. “इंडियन आयडल 11′ या शो मध्ये हे दोघेही परीक्षक आहेत. या दोघांमधील सूत जुळल्याचे या कार्यक्रमादरम्यानच उघड झाले आहे.

आदित्यने कार्यक्रमातच नेहाला उद्देशून अनेकवेळा सूचक वक्‍तव्ये केली आहेत. त्याच्य बोलण्या-वागण्यतून नेहाबाबतचे प्रेम वेळोवेळी दिसून येत होते. नेहाने आदित्यचे हे प्रपोजल अद्याप उघडपणे स्वीकारलेले नाही. नेहाच्या कुटुंबीयांना आणि आदित्यच्या कुटुंबीयांनाही यासंदर्भात कोणताही आक्षेप नाही, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आदित्यचे कुटुंबीय तर नेहाला आपली सून समजायला लागले आहेत. नुकतेच “इंडियन आयडल’मध्ये उदित नारायण आणि अलका याग्निक आले होते. तेंव्हाही याविषयावर खुली चर्चा झाली.

नेहाने आदित्यबरोबर लग्न करायला काही हरकत नाही, असे उदित नारायणने म्हटले तर सेटवर उपस्थित असलेल्या उदितच्या पत्नी दीपा नारायणने सगळ्यांच्या समोर नेहा कक्कडला “बहू’ म्हणून संबोधल्यावर नेहा अश्‍शी लाजली की विचारत सोय नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.