पंतप्रधान पदावरून उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

अमरावती – “पाकिस्तान मध्ये एक खेळाडू पंतप्रधान झाला आणि आपल्याकडे पंतप्रधानपदाचं स्वप्न बघणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला.”, असा टोला शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता लगावला आहे.

शिवसेना–भाजप अमरावतीत युतीचा महामेळावा अमरावती येथे पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मंचावर उपस्थित होते.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, “खुर्ची हे आमचं स्वप्न नाही आहे, देश हे आमचे स्वप्न आहे.” आमचा देश, आमचा हिंदुत्व, आमचा भगवा टिकवण्यासाठी विदर्भातल्या १० च्या १० जागाच नाही तर महाराष्ट्रातल्या ४८ च्या ४८ जागा जिंकाव्याच लागतील.

सामान्य माणुस ज्या आशेने आपल्याकडे बघतो, त्यांच्या आशेवरती पाणी नाही पडलं पाहिजे कारण शिवसेना-भाजप पक्ष देशातील सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.