पंकजा मुंडेंच्या ट्विट’ला उद्धव ठाकरेंचे उत्तर, म्हणाले…

मुंबई: फेसबुकवर केलेल्या भावनिक पोस्टनंतर माजी बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरून भाजप संदर्भात आपली ओळख देखील काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. त्या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता उत्तर दिले आहे. “आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो”

बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विचार करून पुढील मार्गाबाबतचा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. स्वतःशी संवाद साधण्यासाठी 8-10 दिवसांचा अवधी आपल्याला हवा होता. सद्यस्थितीच्या राजकीय पार्श्‍वभुमीवर भविष्यातील रस्त्याच्या निवडीबाबतचा निर्णय घेणे गरजेचे आहे. भविष्यात काय करावे ? लोकांना आपण काय देऊ शकतो ? आपले बलस्थान काय आहे ? जनतेच्या अपेक्षा काय आहेत ? या सर्व मुद्दयांसंदर्भात आपण विचार करणार असून 12 डिसेंबरला ही भूमिका मांडणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?

आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)