मुंबई – मुंबईवर गिधाडं फिरायला लागली आहेत. लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असे विधान केले. तुम्ही आम्हाला जमीन दाखवली, आम्ही तुम्हाला आस्मान दाखवून, अशी जोरदार टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर केली. ( Uddhav Thackeray’s open challenge to Amit Shah )
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेतली. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. यावेळी त्यांनी भाषणात भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. ( Uddhav Thackeray’s open challenge to Amit Shah )
उद्धव ठाकरे म्हणाले, मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजले, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. मुंबईवर गिधाडं फिरायला लागली, लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहे. मुंबई तोडायची आहे त्यांना. लचके तोडायला तुम्ही देणार का? असा सवाल शिवसैनिकांना करत अमित शहांना आव्हान केले. त्यांनी शिवसेनेला जमीन दाखवली, आपण त्यांना आस्मान दाखवू. त्यांना माहिती नाही की इथं जमिनीतून फक्त गवाताची पाती येत नाही तर, तलवारीच्याही पाती येतात.
मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. 105 वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असेही ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
हे माझं ठाकरे कुटुंब आहे. या प्रत्येकाच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील पण माझ्या शिवसैनिकातील मनं मेलेली नाहीत, मनगट चिरलेली नाहीत. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करू नका. काहींनी तसे केले, तरीही मी शांत राहण्याचे आवाहन केले. कारण शांत राहिलो नाही तर रक्तपात होईल. गद्दार आणि शिवसैनिकांमध्ये रक्तपात होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत ठेवा ( Uddhav Thackeray’s open challenge to Amit Shah )
यावेळेला लढाई कशी होणार हे लक्षात घ्या. मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान मैदानात उतरणार आहेत. मुन्नाभाई आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहतो, आणि आम्ही त्याच लढाईची वाट पाहतोय. काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत आहे का, अशी साद घालत मी आव्हान देतो की कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही.