राजगुरूनगर: खेड आळंदी विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी मार्केट, राजगुरूनगर येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याची माहिती आमदार सुरेशभ गोरे यांनी दिली आहे.
आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने तालुक्यात भगवी तोफ धडकणार आहे. ही निवडणूक सुरेश गोरे यांना सोपी असली तरी बहुमत मिळविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर, कृष्णा खोरे विकास नेते मिलिंद नार्वेकर, महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा नितीन बानगुडे, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सेना भाजप, आरपीआय यांच्यासह महायुतीचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.