उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

संग्रहित छायाचित्र...

शहर शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रम

पिंपरी  – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने शहरामध्ये 21 तारखेपासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रविवारपर्यंत (दि. 28) हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत, अशी माहिती शहरप्रमुख योगेश बाबर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहर संघटिका ऍड. ऊर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शहरातील महिलांसाठी मोफत मेमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 450 ते 500 महिलांची तपासणी झाली आहे. या उपक्रमात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे (पिंपरी) सहकार्य मिळाले. शहरामध्ये विभागवार वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. काळेवाडी, पिंपळे सौदागर, किवळे, आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी, वाल्हेकरवाडी, संभाजीनगर, शाहूनगर तसेच शहराच्या विविध सोसायट्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे.

पक्षाच्या काळेवाडी विभागाच्या वतीने विष्णू मंगल कार्यालय येथे रक्‍तदान शिबीर घेण्यात आले. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात अभिषेक करून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्राधिकरण विभागाच्या वतीने मूकबधिर शाळा येथे वह्या वाटप तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील अपंग संस्था व विविध आश्रम येथे फळवाटप करण्यात येणार आहे.

“शासन आपल्या दारी’ उपक्रमातंर्गत विधवा, परित्यक्ता तसेच घटस्फोटित महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानासह राज्य शासनाच्या महसूल विभागाशी निगडीत विविध कल्याणकारी योजनांची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठी दापोडी येथे विशेष शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये एकाच वेळी 342 प्रकरणे मार्गी लागली. येत्या रविवारी (दि. 28) कार्ला येथे कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)