अयोध्या- शिवसेना पक्ष प्रमुख ‘उद्धव ठाकरे’ हे आज आपल्या सहकुटुंबसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे.
No one can stop Modi-led govt from building Ram temple, says Uddhav Thackeray
Read @ANI story | https://t.co/kIInXkETlm pic.twitter.com/BkA6G5KaPz
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2019
दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. “अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा. भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. तसेच आम्ही, एनडीएतील सर्व पक्ष त्यांच्यासोबत आहोतच. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे आपल्याला राम मंदिर बांधण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”. असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.