मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. यावेळी त्यांच्या बरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे. सध्या सांगली आणि कोल्हापूर भागातील पूर ओसरताना दिसत असल्यामुळे शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे या भागांचा दौरा करणार आहेत.
महापुरा मुळे कोल्हापूर, सांगली जिल्हयातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. पूर परिस्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना जमेल तशी मदत पूरग्रस्त भागाला करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या बुधवारी आणि गुरुवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.