मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.