उद्धव ठाकरेंनी राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा : पियुष गोयल

नवी दिल्ली – नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रातून थेट मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे ट्‌वीट पियुष गोयल यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंनी ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यावरून चालवलेल्या क्‍लृप्त्या पाहून दु:ख झाले. देशात जास्तीत जास्त ऑक्‍सिजनचे उत्पादन व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या आपण आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्‍सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्‍सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्‍सिजन पुरवला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्राला आत्तापर्यंत देशात सर्वाधिक ऑक्‍सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्‍य तेवढा प्रयत्न करत असल्याचे गोयल म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.