#Live: सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे- उद्धव ठाकरे

मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

भाषणातील ठळक मुद्दे 

 • “प्राण जाए पर वचन ना जाए ही शिवसेनेची निती आहे, ही शिवसेनेची वृत्ती आहे.
 • “कदाचित या देशातली ही एकमेव संघटना जी समाजकारणही करते आणि राजकारणही करते, ती म्हणजे शिवसेना न चुकता विजयादशमी शिवतीर्थावर साजरी करते.”
 • “विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करायची असते, माझी शस्त्र ही माझ्या समोर महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं पूजन करून मी याच महिन्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायला निघालो आहे.”
 • “आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे.”
 • “आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
 • “आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
 • “आता तुमच्या धनगराच्या काठीला तलवारीची धार लागली पाहिजे, ती काठी नाही ती तलवार असली पाहिजे.”
 • “सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.”
 • “अगदी आमच्या देशावर प्रेम करणारे मुसलमान आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांचे सुद्धा न्यायहक्क मिळवून देऊ.”
 • “हे शिवसैनिक जे आहेत, ही माझी तलवार आहे. गोरगरिबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ढाल आहे आणि प्रेमाने आलिंगन दिल्यानंतर पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणारी ही माझी वाघनखं आहेत.”
 • “लपुनछपून काही करण्याची औलाद ही शिवसेनेची नाही, करू ते उघडपणे करू. प्रेमही उघड करू आणि वैर सुद्धा आम्ही उघड करू.”

दसरा मेळावा – LIVE https://t.co/LDDtocUw0T

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 8, 2019

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here